‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’बाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’बाबत बैठक काल दुपारी झाली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत आयआयटी, मुंबईच्या तज्ज्ञांनी सादरीकरण केले. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. Maharashtra Drone Mission Maharashtra should create the first drone policy and ecosystem in the country Fadnavis
या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढील निर्देश दिले –
१.देशातील पहिले ड्रोन धोरण आणि इकोसिस्टम महाराष्ट्राने तयार करावे.
२.सन 2030 पर्यंत ड्रोन उपकरणांची बाजारपेठ 40 अब्ज डॉलर्स होणार असल्याचा अंदाज आहे. कृषी, वितरण, आपत्ती व्यवस्थापन, बांधकाम निरीक्षण, नियोजन सर्वेक्षण आणि मॅपिंग, सुरक्षा इत्यादी अनेक क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.
३.यासाठी आवश्यक तांत्रिक सहकार्य, प्रशिक्षण, संशोधन व विकास यासाठीचा प्रस्ताव आयआयटी, मुंबईने राज्य सरकारला दिला.
४.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे ‘ड्रोन हब’ बनवण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. यातून 75,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
५.एक राज्यस्तरीय, 6 विभागीय आणि 12 जिल्हास्तरीय ‘ड्रोन सेंटर’ उभारणे प्रस्तावित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more