विशेष प्रतिनिधी
मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दुसऱ्या ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर बॅनर वर झळकली. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाकरे घराण्यातील कोणीही व्यक्ती सरकारी पद स्वीकारणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती, ती प्रतिज्ञा बाजूला सारून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता त्याच ठाकरे घराण्यातील दुसरे ठाकरे अर्थात राज ठाकरे यांची छबी महाराष्ट्रचे भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेना भवनासमोर झळकली आहे. Maharashtra chief ministerial race intensifies, as raj Thackeray’s posters fly high on the streets of Mumbai
पण त्यामुळे ठाकरे घराण्यातील दुसऱ्या ठाकरेंची राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर होण्याबरोबरच महाराष्ट्रात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत तरी किती??, हा प्रश्न तयार झाला आहे. कारण जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून आत्तापर्यंत पंकजा मुंडे, जयंत पाटील, अजितदादा पवार, सुप्रिया सुळे यांची नावे कार्यकर्त्यांनी आपापल्या बॅनर वर झळकवली आहे. त्या प्रत्येकाला कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री असे बिरूद लावले आहे. यावरच्या प्रश्नांना यापैकी काही नेत्यांनी कार्यकर्ते आपल्या नेत्याची अशी पोस्टर्स लावतच असतात, पण ज्यांना महाराष्ट्र विधानसभेतील 145 आमदारांचे बहुमत मिळते तेच मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी उत्तरे दिली आहेत. आता हे कार्यकर्त्यांना माहीत नाही असे नसते, पण कार्यकर्ते स्वतःच्या मनातले मुख्यमंत्री हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून बॅनर वर पेश करत असतात. या यानिमित्ताने स्वतःची छबी देखील नेत्यांबरोबर झळकवण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळत असते आणि आपला नेता मुख्यमंत्री होवो किंवा न होवो आपले छोट्या मोठ्या निवडणुकीतले तिकीट मात्र फिक्स होत असते हे कार्यकर्त्यांना समजते.
आमचे आमदार फुटणे शक्य नाही ; जयंत पाटील यांचा दावा
पण या निमित्ताने आणखी ही बाब जनतेसमोर आली, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची सर्वात मोठी रेस आहे. त्यामध्ये अजितदादा पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचा समावेश आहे. बाकीचे दोन पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदाची रेस असली तरी ती उघडपणे बॅनर वर झळकवण्याची दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची तशी हिंमत नाही आणि तशी हिंमत करणारे कार्यकर्ते बंडखोर म्हणून गणले जाऊन त्यांची ताबडतोब पक्षातून गच्छंती होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापले भावी मुख्यमंत्री आपापल्या मनात ठेवले आहेत आणि त्यांच्या छबी बॅनर वर झळकवलेले नाहीत.
अन्यथा राष्ट्रवादीच काय, पण काँग्रेस, भाजप शिवसेनेतले दोन्ही गट यांच्यामध्ये जनतेच्या मनातल्या भावी मुख्यमंत्री यांची शर्यत आपल्याला वेगवेगळ्या पोस्टर्स वर बघायला मिळाली असती. सध्या ही शर्यत राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यापुरतीच मर्यादित असल्याचे दिसते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App