भारतातील तंत्रज्ञान हे केवळ Mode of Power नसून Mission to Empower आहे. असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘’भारत आता दूरसंचार तंत्रज्ञानाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 5G च्या सामर्थ्याने, संपूर्ण जगाची कार्य-संस्कृती बदलण्यासाठी भारत अनेक देशांसोबत एकत्र काम करत आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.’’ दिल्लीतील आयटीयू एरिया ऑफिस आणि इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती होती. India is rapidly moving towards the next phase of digital revolution PM Modi
‘’भारताचे 5G रोलआउट जगातील सर्वात वेगवान; अवघ्या सहा महिन्यांत १,१५,०० साइट्कडून 5G सिग्नल प्रसारित’’
पंतप्रधान मोदी म्हणाले ‘’हे दशक भारतीय तंत्रज्ञानाचे दशक आहे. भारताचे दूरसंचार आणि डिजिटल मॉडेल सहज, सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि चाचणी केलेले आहे. आज आपण 5G रोलआउटच्या सहा महिन्यांनंतरच 6G बद्दल बोलत आहोत. यातून भारताचा आत्मविश्वास दिसून येतो. आज आपण आपले व्हिजन डॉक्युमेंटही सादर केले आहे. पुढील काही वर्षांत 6G रोलआउटसाठी हा एक प्रमुख आधार बनेल.’’
अब भारत दुनिया में telecom technology का बड़ा exporter होने की दिशा में आगे बढ़ रहा है। 5G की जो शक्ति है, उसकी मदद से पूरी दुनिया का Work-Culture बदलने के लिए भारत कई देशों के साथ मिलकर काम कर रहा है। – पीएम @narendramodi pic.twitter.com/3fA6fNuRyI — BJP (@BJP4India) March 22, 2023
अब भारत दुनिया में telecom technology का बड़ा exporter होने की दिशा में आगे बढ़ रहा है।
5G की जो शक्ति है, उसकी मदद से पूरी दुनिया का Work-Culture बदलने के लिए भारत कई देशों के साथ मिलकर काम कर रहा है।
– पीएम @narendramodi pic.twitter.com/3fA6fNuRyI
— BJP (@BJP4India) March 22, 2023
याशिवाय, ‘’आजचा भारत डिजिटल क्रांतीच्या पुढच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. आज भारत हा जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट देश आहे. अवघ्या १२० दिवसांत, 5G १२५ हून अधिक शहरांमध्ये आणले गेले आहे. 5G सेवा देशातील सुमारे ३५० जिल्ह्यांमध्ये पोहोचली आहे. आता भारतातील खेड्यांमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शहरांमध्ये राहणाऱ्या इंटरनेट वापरकर्त्यांपेक्षा जास्त आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात डिजिटल पॉवर कशी पोहोचत आहे याचा हा पुरावा आहे. ’’ असंही मोदींनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App