Maharashtra cabinet expansion  : पहिल्याच झटक्यात 39 मंत्र्यांसह फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार; नव्यांच्या समावेशाने मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलला!!

विशेष प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधी सोहळा झाला. अनेक नव्या मंत्र्यांचा समावेश केल्याने मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलला. Maharashtra cabinet expansion

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी आज शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 जणांनी कॅबिनेट तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपाच्या 3, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांची संपूर्ण यादी

1) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा
2) राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा
3) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
4) चंद्रकांत पाटील, भाजपा
5) गिरीश महाजन, भाजपा
6) गुलाबराव पाटील, शिवसेना
7) गणेश नाईक, भाजपा
8) दादा भुसे, शिवसेना
9) संजय राठोड, शिवसेना
10) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
11) मंगलप्रभात लोढा, भाजपा
12) उदय सामंत, शिवसेना
13) जयकुमार रावल, भाजपा
14) पंकजा मुंडे, भाजपा
15) अतुल सावे, भाजपा
16) अशोक उईके, भाजपा
17) शंभूराज देसाई, शिवसेना
18) आशिष शेलार, भाजपा
19) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
20) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
21) शिवेंद्रराजे भोसले, भाजपा
22) माणिकराव कोकाटे, भाजपा
23) जयकुमार गोरे, भाजपा
24) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
25) संजय सावकारे, भाजपा,
26) संजय शिरसाट – शिवसेना
27) प्रताप सरनाईक, शिवसेना
28) भरत गोगावले, शिवसेना
29) मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
30) नितेश राणे, भाजपा
31) आकाश फुंडकर, भाजपा
32) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
33) प्रकाश आबिटकर, शिवसेना
34) माधुरी मिसाळ, भाजपा (राज्यमंत्री)
35) आशिष जैस्वाल, शिवसेना (राज्यमंत्री)
36) पंकज भोयर, भाजपा (राज्यमंत्री)
37) मेघना बोर्डीकर, भाजपा (राज्यमंत्री)
38) इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (राज्यमंत्री)
39) योगेश कदम, शिवसेना (राज्यमंत्री)

आता मंत्र्यांच्या खातेवाटपाची प्रतीक्षा आहे. ते रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता आहे.

Maharashtra cabinet expansion

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात