वृत्तसंस्था
ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात आणि आसपास ४० बांगलादेशींना बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. ते भिवंडीतील तीन वेगवेगळ्या पोलीस हद्दीत राहत होते. Maharashtra: Bhiwandi Police arrest 40 illegal Bangladeshi immigrants, fake Indian IDs seized
भिवंडीत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या ४० बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. भिवंडी पोलिसांनी एकाच महिन्यात ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. अटक केलेले सर्व बांगलादेशी वळगाव इथल्या प्रितेश कंपाऊंड आणि कामतघर येथील चाचा भतीजा कंपाऊंडमध्ये मजुरी करत होते.
पोलिसांनी छापा टाकून या सर्वांना अटक केली आहे. अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींकडून पासपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, २८ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App