नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतले मतदान संपल्यानंतर बहुतेक वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल बाहेर आले. त्यातून बहुतांश वृत्तवाहिन्यांनी भाजप महायुतीच सत्तेवर येईल, असे भाकीत वर्तविले. त्यात वेगवेगळे आकडे वेगवेगळ्या संस्थांनी सादर केले. त्यामध्ये अगदी 135 ते 160 – 75 पर्यंत महायुती, ते 80 ते 125 महाविकास आघाडी असे आकडे यातून दिसले. वेगवेगळ्या संस्थांचे आकडे वेगवेगळे असले तरी सर्वसाधारण सूर महायुतीचा विजय आणि महाविकास आघाडीचा पराभव असाच राहिलेला दिसतो आहे. Maharashtra assembly elections exit polls
अर्थात एक्झिट पोलची विश्वासार्हता किती आहे??, हे लोकसभा आणि त्यानंतरच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतून सगळ्या जनतेसमोर आलेच आहेत. हे दोन्ही एक्झिट पोल फेल गेले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून आकड्यांच्या जंजाळात अडकणे देखील चूकच आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्याही एक्झिट पोल मधल्या आकड्यांवर जसाच्या तसा विश्वास ठेवणे कठीण आहे.
तरी देखील आकड्यांच्या जंजाळापलीकडचे सत्य या एक्झिट पोलनी मांडल्याचे दिसून येते, ते म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मिळवलेला “अडवांटेज” अवघ्या चार महिन्यांमध्ये विधानसभेत गमावला. महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाला राजकीय अहंकार चढला. प्रत्येक पक्षाने जागा वाटपात जी खेचाखेच केली, ती महाराष्ट्राच्या जनतेला आवडली नाही.
– त्या पलीकडे जाऊन ज्या जात वर्चस्वाच्या अजेंड्यावर शरद पवारांनी आणि काँग्रेसने लोकसभेची निवडणूक महाराष्ट्र पुरती जिंकून दाखवली, तो जात वर्चस्वाचा अजेंडा विधानसभेत “फेल” गेला. अगदी महाविकास आघाडी जरी सत्तेवर आली, तरी लोकसभेतला “अडवांटेज” त्या प्रमाणात टिकवता आला नाही, असे तरी निदान एक्झिट पोलने दाखवून दिले आहे.
बखर लाईव्हच्या वृत्ताची दखल, क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यावर भाजप राष्ट्रीय प्रवक्त्यांचे पाच प्रश्न
– लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला आणि त्या फॅक्टरने पवारांच्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले. पण जरांगे फॅक्टर हिंदू मतांमध्ये फूट पाडतो हे लक्षात येताच हिंदूंची एकजूट झाली आणि त्यांनी ती मतदानाद्वारे दाखवून दिली हे मान्य करावे लागण्याची परिस्थिती एक्झिट पोलने आणली.
– मुंबई आणि परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुस्लिमांनी मते दिली. त्यामुळे लोकसभेत त्यांचा पक्ष ठरला विधानसभेत देखील मुस्लिमांनी त्यांच्या शिवसेनेची एकनिष्ठा दाखवल्याचे चित्र एक्झिट पोलने दाखविले, पण लोकसभेला मिळालेले नऊ खासदारांचे यश विधानसभा निवडणुकीत 35 ते 40 आमदारांपर्यंतच येऊन राहिले हे देखील याच एक्झिट पोलने दाखविले.
– याचा अर्थ हिंदू मतांचे कन्सोलिडेशन महायुतीच्या बाजूने अधिक प्रभावी ठरले. संघ परिवारातल्या 65 संस्था जमिनीवर उतरून मतदार याद्यांवर प्रत्यक्ष काम करत होत्या. बूथ यंत्रणा जास्तीत जास्त प्रभावी केल्या. जात वर्चस्वाचा अजेंडा मोडून काढण्यासाठी “बटेंगे तो कटेंगे”, “एक रहेंगे, तो सेफ रहेंगे” या घोषणांचा परिणामकारक वापर केला हे सत्य निदान या एक्झिट पोलने तरी दाखवून दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App