प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीचा आदेश झुगारत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. Maha Vikas Aghadi’s back to Chief Minister’s meeting of MPs of all parties
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खासदारांची बैठक सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या खासदारांनी पाठ फिरवली.
मात्र, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे त्यात सहभागी झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत सहभागी न होण्याचे आवाहन महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी आपल्या खासदारांना केले होते. मात्र, अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावली. एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे देखील बैठकीला हजर होते.
.
खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने झडत आहेत. आधी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची भेट, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली गुप्त भेट, आमदार रोहित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दांडी, अशा अनेक घडामोडींमुळे अमोल कोल्हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा खुद्द राष्ट्रवादीच्या कर्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहेत. त्यात कोल्हे यांनी थेट महाविकास आघाडीचा आदेश झुगारत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App