केंद्र सरकारने हे सिद्ध करून दाखवावे की आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही,अस देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.Made a movie in the name of Rani Lakshmibai of Jhansi, made money, wanted to wake up to the salt she ate, Rupali Chakankar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.यात ती म्हणाली की , भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती,आणि खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले आहे. यामुळे आता एक नवीनच वाद निर्माण झाला आहे.कंगनाच्या या वक्तव्यावरुन भाजपाच्या नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील कंगनाला जोरदार टोला लगावला आहे.
यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की , देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाचा हा अपमान आहे. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले,त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की देशाची एकता, अखंडता आणि अस्मिता यामध्ये फूट पाडणाऱ्या कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घेण्याची मागणी केली आहे.तसेच तिच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि केंद्र सरकारने हे सिद्ध करून दाखवावे की आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही,अस देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या.
देशाची एकता, अखंडता आणि अस्मिता यामध्ये फूट पाडणाऱ्या कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही हे केंद्र सरकारने सिद्ध करावे. 2/3 — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 12, 2021
देशाची एकता, अखंडता आणि अस्मिता यामध्ये फूट पाडणाऱ्या कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही हे केंद्र सरकारने सिद्ध करावे. 2/3
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 12, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App