हिंदुत्व म्हणजे मुसलमान – शिखांना मारणे!!; राहुल गांधींनी केला हिंदुत्वावर नवा आरोप


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या असताना देशाच्या राजकारणात हिंदुत्व ही संकल्पना ऐरणीवर आली आहे. हिंदू धर्म (Hinduism) आणि हिंदुत्व (Hindutva) वेगवेगळे आहेत. जर ते वेगवेगळे नसते तर त्या दोन्ही गोष्टींना वेगवेगळी नावे का दिली गेली असती? हिंदू धर्म म्हणजे अन्य धर्मांचा द्वेष नाही. पण हिंदुत्व म्हणजे मुसलमान आणि शिखांना मारणेच होय, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदुत्वाची “नवी व्याख्या” केली आहे. Hindutva means Muslims – killing Sikhs !!; Rahul Gandhi made new allegations against Hindutva

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून हिंदुत्व संकल्पना देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जनजागरण अभियानाचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले त्यावेळी हिंदुत्वाविषयी आपले विचार व्यक्त केले.

राहुल गांधी म्हणाले, की आपल्याला मान्य असो अथवा नसो आज संघ आणि भाजपची द्वेषमूलक विचारधारा देशात पसरली आहे. काँग्रेसच्या उदारमतवादी विचारसरणीला संघ आणि भाजपच्या द्वेषमूलक विचारसरणीने झाकोळून टाकले आहे. आपणच आपली उदारमतवादी विचारसरणी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये रुजवायला कमी पडलो आहोत. आता आपण आपल्यात बदल केला पाहिजे आणि आपण आक्रमकपणे आपली विचारप्रणाली जनतेपर्यंत पोहोचविली पाहिजे. हिंदू धर्म हा इतर धर्मांचा द्वेष करायला शिकवत नाही.

हिंदू धर्म उदारमतवादी आहे. पण हिंदुत्व तसे नाही हिंदू धर्म म्हणजे (Hinduism) हा मुसलमान आणि शिखांना मारायला शिकवत नाही हिंदुत्व (Hindutva) मात्र मुसलमान आणि शिखांना मारायला शिकवते, अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर ताशेरे झोडले आहेत.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आयोध्येविषयी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात स्वतः सलमान खुर्शीद, दिग्विजय सिंग आणि पी. चिदंबरम या नेत्यांनी देखील हिंदू धर्म आणि हिंदुत्व या दोन भिन्न कल्पना असून राजकीय हिंदुत्व इतरांचा द्वेष करायला शिकवते अशाच स्वरूपाची मांडणी केली होती. त्याच्यापुढे जाऊन राहुल गांधी यांनी आज हिंदुत्व म्हणजे मुसलमान आणि शिखांना मारणे हेच होय, अशी “नवी व्याख्या” काँग्रेसच्या जनजागरण अभियानात केली आहे. या मुद्यावरून देशांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर वादंग सुरू झाला आहे.

Hindutva means Muslims – killing Sikhs !!; Rahul Gandhi made new allegations against Hindutva

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात