विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये अलीकडे सतत हवामान बदलते आहे. ढगाळ वातावरण असते. सकाळी आठ वाजता पहाटेचे पाच वाजले आहेत असे वातावरण होते. चार दिवस थोडाफार पाऊस होतो आहे.
Loss to farmers and daily life due to unseasonal rain
ऐन थंडीतही पावसाची हजेरी , कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत ; शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान
बुधवारी सकाळी सुमारे अर्धा तास जोरात पाऊस झाला. सकाळी कामावर निघालेल्या लोकांची त्रेधातिरपिट झाली. शहरांमध्ये रस्त्यांवर चिखल झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे गुह्राळ चालवणारे तसेच साखर कारखान्यांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कापणी केलेले भात भिजले आहे. या आठवड्यात पावसाच्या तुरळक सरी जिल्ह्यामध्ये पडत होत्या. बुधवारी आता हिवाळा चालू आहे का पावसाळा हेच कळत नव्हते. सकाळी रिमझिम पाऊस पडत होता. परंतु नंतर अर्धा तास जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले व शेतकऱ्याना या पावसामुळे फटका बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App