ऐन थंडीतही पावसाची हजेरी , कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत ; शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान

बुधवारपासून कोल्हापूरमध्ये पावसानं अर्धा तास चांगलाच जोर धरला आहे. या अवकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे.Presence of rains in cold weather disrupts life in Kolhapur; Lots of losses to farmers too


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : हिवाळा सुरू झाल्याने राज्यात थंडीची लाट सुरु आहे. परंतु आता कडाक्याची थंडी कमी होत असून अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. अनेक ठिकाणी या अवकाळी पावसामुळे शेतीचंही नुकसान झालं आहे.ऐन थंडीतही पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिक चिंतेत होते.बुधवारपासून कोल्हापूरमध्ये पावसानं अर्धा तास चांगलाच जोर धरला आहे. या अवकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान झालं आहे. पावसाचा फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरांना बसला असून कापणी केलेले भात अनेक ठिकाणी भिजले.

Presence of rains in cold weather disrupts life in Kolhapur; Lots of losses to farmers too

महत्त्वाच्या बातम्या