विद्यमान सतराव्या लोकसभेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरल्या आहेत.LOKSABHA: Supriya Sule tweeted the information herself; Supriya Sule becomes number one MP in Lok Sabha!
विशेष प्रतिनिधी
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर झाली असून संसदेतील खासदारांच्या कामगिरीच्या आधारे ‘पीआरएस’ या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहिर केली आहे. त्यात सुप्रिया सुळे या यंदाही अव्वल ठरल्याचे नोंदविण्यात आले आहे.
लोकसभा अधिवेशनातील उपस्थितीसह प्रश्नोत्तरे, विविध चर्चांमधील सहभाग, खासगी विधेयके आदींचा यात प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला आहे. या यशासाठी खासदार सुप्रिया यांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघातील सर्व मतदारांचे आभार मानत संसदेतील त्यांच्या कामगिरीची आकडेवारी जाहीर केली आहे.
सर्व मतदारांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम यामुळे हे शक्य झाले, असे त्यांनी म्हटले आहे.
या १७ व्या लोकसभा अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर झाली.संसदेच्या रेकॉर्डस् मधील नोंदीनुसार 'पीआरएस' या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहिर केली आहे. pic.twitter.com/Q4imILKzt6 — Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2022
या १७ व्या लोकसभा अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर झाली.संसदेच्या रेकॉर्डस् मधील नोंदीनुसार 'पीआरएस' या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहिर केली आहे. pic.twitter.com/Q4imILKzt6
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2022
बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सहयोगी पक्ष आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्या सर्वांच्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत असून
यातूनच आपल्याला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते, असेही त्यांनी म्हटले आहे. यापुढेही संसदेच्या माध्यमातून मतदारसंघातील व राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू याची ग्वाही देत पुन्हा त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता,@NCPspeaks, सहयोगी पक्ष व कार्यकर्त्यांनी मला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.आपल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.यातूनच मला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते. — Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2022
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता,@NCPspeaks, सहयोगी पक्ष व कार्यकर्त्यांनी मला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.आपल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.यातूनच मला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते.
सुप्रिया सुळे यांची १७ व्या लोकसभेतील कामगिरी
एकूण उपस्थिती: ९१% एकूण चर्चासत्र: १५९ एकूण प्रश्न: ३८३ खाजगी विधेयक: ७
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App