विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीतर्फे विधानपरिषदेसाठी कोण उभारणार यासाठी बरीच उत्सुकता होती. आता ही उत्सुकता संपली आहे. काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये कोल्हापुरातून अमल महाडिक यांच्या नावाची निश्चिती केली गेली आहे. अधिकृत घोषणा दिल्लीमधून काही कालावधीत होईल असे सूत्रांकडून कळते.
Legislative Council elections; Amal Mahadik against Satej Patil in Kolhapur
महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात अमल महाडिक यांची भाजपकडून नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोण असणार? याबद्दल गेल्या आठ दिवसांपासून अनेक तर्कवितर्क सुरू होते. समरजित घाटगे, माजी आमदार सुरेश हळवणकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या नावांची चर्चा जोरदार रंगली होती.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
निवडणुकीची घोषणा होऊन आठ दिवसापासून भाजपकडून कोणत्याही उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा पेच खूप कठीण झाला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची आज मुंबई येथे बैठक झाली आणि तेथे हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App