Laxman Hake : जरांगे बिनबुडाचा लोटा, 96 कुळी म्हणतात आणि मागासांचे आरक्षण मागतात; लक्ष्मण हाकेंचे शरसंधान!!

Laxman Hake targets manoj jarange

विशेष प्रतिनिधी

पुणे : मनोज जरांगे हा बिनबुडाचा लोटा आहे. ज्या लोकांनी मनोज जरांगेंना आंदोलन करायला प्रवृत्त केले, त्या लोकांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आणि ओबीसी उमेदवार पाडले, असे वक्तव्य ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले. Laxman Hake targets manoj jarange

एका बाजूला जरांगे स्वत:ला 96 कुळी मराठे म्हणवतात आणि दुसरीकडे मागासवर्गीयांच्या ओबीसीतून आरक्षण मागतात. हा प्रचंड विरोधाभास असून ही गोष्ट हास्यास्पद आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगेंनी 288 उमेदवार रिंगणात उतरवल्यास ओबीसी समाजाने आणि सुज्ञ नागरिक याचा जाब मनोज जरांगे यांना नक्की विचारतील, असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


Patanjali : सुप्रीम कोर्टातील पतंजलीवरील अवमानाचा खटला बंद; बाबा रामदेव-आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारली


यावेळी लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. वडीगोद्री येथे केलेले उपोषण सोडताना सरकारने काही आश्वासने दिली होती. पण ती सरकारने पूर्ण केली नाहीत, असे त्यांनी म्हटले. मनोज जरांगे राज्यभरात मराठा शांतता रॅली काढतात पण शांतता रॅलीला शाळा का बंद ठेवल्या जातात??, यावर आमचा आक्षेप आहे. याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था सरकार पाळू शकत नाही का??, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.

राज्यातील बोगस कुणबी नोंदींवर आम्ही आक्षेप घेतला होता. मात्र, त्यावर सरकारने काहीही कारवाई केली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांना रेड कार्पेट घालतात. ⁠पण जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. ⁠शरद पवार यांनी सर्वपक्षीय तसेच ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्या एकत्रित बैठक बोलवनाच्या सुचनेचे आम्ही स्वागत करतो. आम्ही या बैठकीला नक्की जाऊ. पण पवारांचे ते निमंत्रण म्हणजे लबाडाघरचे अवताण आहे, असे टीकास्त्र हाके यांनी सोडले.

प्रशासनामार्फत तीन वर्षांपासून नगरपालिका, महापालिका, जिल्हा परीषदेचा कारभार चालवला आहे. त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ओबीसींचे हक्क डावलले जात असल्याचा आरोप हाके यांनी केला.

Laxman Hake targets manoj jarange

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात