लता मंगेशकर यांचं सध्याचं वय 92 वर्ष आहे. त्यांच्या वयाचा विचार करता लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. Lata Mangeshkar: Singer Lata Mangeshkar admitted to ICU with corona infection
विशेष प्रतिनिधी
मुंबई:भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
लता मंगेशकर यांचं वय 92 वर्ष असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.
लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि इतर काही आरोग्य विषयक समस्यांमुळं खबरदारी घेण्यात येत असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे. लता मंगेशकर यांचं वय पाहता होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App