कर्ज नाकारल्याने एकाने चक्क बँकच पेटविली; कर्नाटकातील घटना, लाखो रुपयांचे नुकसान


वृत्तसंस्था

बंगळूर : कर्ज नाकारल्याने एकाने चक्क बँकच पेटविल्याची घटना कर्नाटक राज्यात घडली असून त्यात बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कर्नाटकातील हवेरी तालुक्यात ही घटना घडली आहे. एकाने बँकेत कर्ज मिळविण्यासाठी अर्ज केला होता. पण, तो नामंजूर केला. त्यामुळे नाराज झालेल्या व्यक्तीने बँकेलाच आग लावून दिली. या प्रकरणी त्याच्याविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. One of them set the bank on fire for refusing a loan; Incidents in Karnataka, loss of millions of rupees

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. परंतु कागदपत्रांच्या छाननी नंतर त्याचा अर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांनी नामंजूर केला. त्यामुळे निराश आणि संतप्त झालेल्या व्यक्तीने बँकेला आग लावली.



राठ्ठीहल्ली येथील हजरत साब मुल्ला ( वय ३३), असे आरोपीचे नाव आहे. त्याने कॅनरा बँकेच्या हेलिडगोंडा येथील शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता. तो नामंजूर झाल्याने मुल्ला याने शनिवारी रात्री खडकीची काच फोडून बँकेत पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत कॅश काउंटर, केबिन, सीसीटीव्ही, पाच कॉम्प्युटर, पासबुक प्रिंटर, स्कॅनर, पैसे मोजणारे मशीन आदी इलेक्ट्रिक वस्तू, असे मिळून १२ लाखांचे नुकसान झाले आहे.

One of them set the bank on fire for refusing a loan; Incidents in Karnataka, loss of millions of rupees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात