विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला, तसेच भारतरत्न लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लतादीदींचे अंतिम दर्शनासाठी मुंबईत येणार आहेत. लतादीदींवर शिवतीर्थावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, तशी तयारी सुरु करण्यात आली आहे. lata mangeshakar passed away
आपल्या जादूई आवाजाने अनेक पिढ्यांवर गारूड निर्माण करणाऱ्या आणि आपलं संपूर्ण आयुष्य संगीत साधनेला अर्पण करणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. तब्बल 28 दिवसांपासून सुरू असलेला जीवनमरणाचा संघर्ष थांबला. संध्याकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांचे पार्थिव छत्रपती शिवाजी पार्कात काही वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा मुंबईत शिवाजी पार्कवर येऊन लतादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
शिवाजी पार्क येथे त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर ज्या प्रमाणे शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, तसेच अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव प्रभूकुंज येथे ठेवले होते. तेथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच अनेक बॉलीवूडमधल्या कलाकारांनी जाऊन लतादीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App