जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने 17 लाखांची फसवणूक

पाच गुंठे जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने पाच जणांची तब्बल 17 लाख 13 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार धनवकवडीतील बालाजीनगर येथे घडला.


विशेष प्रतिनिधी

पुणे – पाच गुंठे जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने पाच जणांची तब्बल 17 लाख 13 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार धनवकवडीतील बालाजीनगर येथे घडला. याप्रकरणी सातार्‍यातील एजंटला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.Land purchaseing reason five persons cheated by businessman १७ lakhs rupees

विनोद सोमनाथ राठोड (31, रा. टक्कर सिटी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत संदिप अर्जुन जगताप (51, रा. स्वप्नविश्व, पार्क सोसायटी, उरूळी देवाची, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2018 ते 2021 दरम्यान घडला. फिर्यादी संदिप जगताप यांच्या पत्नीचा विश्वास संपादन करून राठोड याने



पाच गुंठे जमीन खरेदी करून देण्याचे आश्वासन जगताप यांची पत्नी, वैभव महाजन, रविंद्र लोहार, नारायण लोहार, संगिता पिसाळ यांना दिले. त्या बदल्यात त्यांच्याकडून 17 लाख 13 हजार रूपये घेतले. परंतु, कोणतीही जमीन खरेदी करून न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादी यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

Land purchaseing reason five persons cheated by businessman १७ lakhs rupees

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात