विशेष प्रतिनधी
काेल्हापूर : बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना काेल्हापूर जिल्ह्यातही बालिकेवर अत्याचार घडल्याची घटना उघडकीस आली आहे.
करवीर तालुक्यातील शिवे येथे एका दहा वर्षांच्या बालिकेवरअत्याचारा करून तिचा खून करण्यात आला. एका ऊसाच्या शेतात या बालिकेचा मृतदेह सापडला. चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. बुधवारपासून ही मुलगी बेपत्ता होती. त्यानंतर गुरुवारी घराजवळच तिचा मृतदेह आढळला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
MVA : महाविकास आघाडीच्या मुंबईतल्या जागा वाटपात ठाकरे आणि काँग्रेस तोट्यात; पण पवारांची राष्ट्रवादी ना फायद्यात, ना तोट्यात!!
याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती समजताच संपूर्ण काेल्हापूर जिल्ह्यात संताप व्यक्त हाेत आहे. या मुलीचे कुटुंबिय परप्रांतीय आहे. बुधवारपासून ही मुलगी गायब हाेती. नातेवाइकांनी पाेलीसांत तक्रार दिली हाेती. पाेलीसांनी सीसीटीव्ही तपासले मात्र तपास लागला नाही.
आज एका ऊसाच्या फडात या बालिकेचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती कळताच जिल्हा पाेलीस अधीक्षक महेंद्र पंडीत घटनास्थळी पाेहाेचले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App