प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) निवडणुकीत अध्यक्षपदी केशरताई सदाशिव पवार (शिरूर) यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी राहुल रामदास दिवेकर (दौंड) यांचीही कात्रज डेअरीच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्षाची निवड झाली. Keshartai Pawar as the President of Katraj Dairy Election of a female president for the first time
सध्याचा विचार केला तर रोज अडीच लाख लिटर दुधाचं संकलन हा संघ करतो आणि संघाची वार्षिक उलाढाल सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे कोटींच्या घरात गेली आहे.पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा’ची स्थापना सन १९६० मध्ये करण्यात आली. दुधाचे संकलन करून ते मुंबईला ‘महानंदा’ डेअरीला पाठवणे, अशा स्वरुपाचं काम कात्रज डेअरीकडून सुरू होते. त्या वेळी डेअरीकडून प्रतिदिन ३० हजार ते ५० हजार लिटर दुधाचं संकलन केले जात असे.
अनेकदा मुंबईत मागणी नसेल तर दूध परत येत असे. शिवाय संस्थेवर शासनाकडून जे कार्यकारी संचालक नेमले जायचे, ते बदलत राहायचे. परिणामी धोरणात सातत्य रहायचे नाही. एकुणात कामकाज तोट्यात चालले होते. सन २००० नंतर तेव्हाच्या संचालकांनी काही धाडसी निर्णय घेतले आणि दूधविक्रीबरोबरच दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचा दूध संघाला चांगला फायदा झाला. दरवर्षीचा तोटा कमी होत पुढे दूध संघ फायद्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App