गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव उघडकीस -कात्रज परिसरातील खूनाचा प्रकार पाेलीसांकडून उघड


कात्रज परिसरातील लक्ष्मी माता मंदिराजवळ एका लाेखंडी पाईपला इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला हाेता पाेलीसांनी सदर इसमाचे शवविच्छेदन केले असून त्याने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. Katraj area two days before police found succide case one body.. after postmortem report that was not succide case but the murder case


विशेष प्रतिनिधी

पुणे-कात्रज परिसरातील लक्ष्मी माता मंदिराजवळ एका लाेखंडी पाईपला इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला हाेता पाेलीसांनी सदर इसमाचे शवविच्छेदन केले असून त्याने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झाल्याचा प्रकार समाेर आला. प्रकाश किसन जाधव (वय-४२,रा.कात्रज,पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी अज्ञात आराेपी विराेधात भारती विद्यापीठ पाेलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाेलीस नाईक नंदलाल भादले यांनी आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. प्रकाश जाधव हा बिगारी काम करत हाेता. शुक्रवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घरासमाेरील लाेखंडी पाईपला त्यांनी दाेरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले हाेते. त्याने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला वाटत हाेते,

परंतु त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाेलीसांनी शवविच्छेदनाकरिता पाठविल्यानंतर त्याला गळा दाबून तसेच डाेक्यात काेणत्यातरी हत्याराने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार समाेर आला. आराेपीने खून केल्यानंतर मृतदेह लाेखंडी पाईपला लटकवून त्याने गळफास घेतल्याचा बनाव केला आहे. याप्रकरणी पाेलीस आराेपीचा शाेध घेत असून यासंर्दभात पुढील तपास भारती विद्यापीठ पाेलीस करत आहे.

Katraj area two days before police found succide case one body.. after postmortem report that was not succide case but the murder case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था