अरे थांबवा ही लूट! कवी सौमित्र यांची प्रशासनावर ताशेरे ओढणारी पोस्ट!

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात टोल हा कायमच मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात अनेकदा या टोलवरून रणकंदन झालं आहे. सध्या तर टोल वरून महाराष्ट्रात चांगलाच वाद पेटलाय.
राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसेचे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याबद्दल मनसैनिकांनी टोलनाका फोडल्याच्या बातम्या आल्या होत्या. Kavi Sumitra Toll Naka post

त्यानंतर मनसैनिकांकडून आणि टोलनाक्यांची तोडफोड करण्यात आली. राजकीय नेत्यांबाबत जेव्हा हा प्रयत्न प्रसंग उभा राहतो . तेव्हा तोडफोड होते त्याची बातमी होते. कुठेतरी त्या गोष्टीची दखल घेतल्या जाते . मात्र सर्वसामान्य लोकांनचीं केवळ घुसमट होते.



काही ठिकाणी तर विनाकारण टोल दोन वेळा घेण्यात येतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसते. काही दिवसांपुर्वी मराठी अभिनेत्री ऋतुजा देशमुखने हिने टोलनाक्यावर अधिक टोल कापल्याने व्हिडीओ शेअर करत तक्रार केली होती. आता त्यातच आणखी एका कलाकारांने पोस्ट शेयर करत संताप व्यक्त केला आहे.कामानिमित्त मराठी कलाविश्वातील कलाकारांना अनेकदा मुंबई- पुणे असा प्रवास करावा लागतो. तर पुण्यात राहणारे कलाकार देखील कामासाठी मुंबईला जातात.

मुंबई- पुणे महामार्गावर प्रवास करतांना प्रत्येकाला टोल भरावा लागतो. आता अशातच कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट शेयर करत या बद्दल संताप व्यक्त केला आहे.कवी सौमित्र त्याच्या पोस्टमध्ये लिहितात की, “मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस हायवे वर 240 टोल घेतात .. मध्ये मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात ?टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्या बद्दल कुणी बोललं का ?आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात ?अरे लूट थांबवा रे ही ..लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ?कुणाकडे तक्रार करायची ?याला जबाबदार अधिकारी कोण आहेत ?”त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि अनेकांनी त्यांना पाठिंबा देत त्यांनाही असाच अनुभव आल्याचे सांगितले आहे.

Kavi Sumitra Toll Naka post

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात