कसब्यात धंगेकरांपुढे काँग्रेससह आघाडीतील घटक पक्ष बरोबर ठेवण्याचे आव्हान; रासने – भाजप पुढे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यामुळे होत असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने या दोन्ही उमेदवारांपुढे वेगवेगळी आव्हाने उभी आहेत. दोन्ही उमेदवारांमध्ये काही कॉमन फॅक्टर देखील आहेत, ते पक्षांतर्गत नाराजीचे आहेत. त्या नाराजीवर मात करून आपला प्रचार पुढे नेण्याचे आणि त्या प्रचाराचे रूपांतर मतांमध्ये करण्यामध्ये मात्र रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यापुढे वेगवेगळी आव्हाने आहेत.Kasba Byelection : Congress facing political extinction, voting percentage is BJP’s challenge

 धंगेकर प्रभावी पण काँग्रेस संघटनेचे काय??

रवींद्र धंगेकर हे पुण्यातले एक प्रभावशाली नगरसेवक आहेत, हे खरे. पण वारंवार पक्षांतरामुळे त्यांची राजकीय प्रतिमा अस्थिर झाली आहे. काँग्रेस मधून त्यांनी उमेदवारी मिळाली मिळवली असली तरी ते मूळचे काँग्रेसचे नाहीत. त्यामुळे कसबापेठेत आधीच कमी उरलेले काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात कितपत मनापासून सहभाग घेतात हा महत्त्वाचा प्रश्न धंगेकर यांच्यापुढे आहे. आपल्या वैयक्तिक कामावर आणि संघटन कौशल्यावरच सध्या धंगेकर कसब्यातली निवडणूक लढवत आहेत. धंगेकर हे मनसे प्रभावी असताना त्या पक्षाचे नगरसेवक होते. राज ठाकरेंच्या प्रभावामुळे मनसेने पुणे महापालिकेत 29 नगरसेवक निवडून आणले होते. त्यावेळी धंगेकर हे गटनेते होते. मनसेचा प्रभाव त्यानंतर पुण्यात टिकला नाही. त्यामुळे धंगेकर यांनी नंतर काही काळ भाजपमध्ये आणि आता काँग्रेसमध्ये आपले नशीब आजमावले आहे. काँग्रेसने त्यांना विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी जरूर दिली आहे, पण कसबा असा मतदार संघ आहे ज्या मतदारसंघात काँग्रेसचे संघटनात्मक अस्तित्व सध्या शून्यवत आहे.



काँग्रेसची संघटना कमकुवत

तात्या थोरात हे 1991 मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे शेवटचे आमदार कसब्यातले शेवटचे आमदार. त्यानंतर कसब्यात एकदाही काँग्रेस विजयी होऊ शकलेली नाही. कसबा मतदारसंघातील 20 नगरसेवकांपैकी एक दोन नगरसेवक वगळता बाकी सगळे नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे मूळातच अस्तित्व घटलेल्या काँग्रेस संघटनेत जान फुंकणे आणि ती संघटना प्रचाराच्या कामाला लावणे हे धंगेकर यांच्याकडे फार मोठे आव्हान आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे कार्यकर्तेही कसब्यात कमीच आहेत. त्यामुळे धंगेकर यांच्यासाठी स्वबळ आणि महाविकास आघाडीतले उरलेले बळ यांची बेरीज करून निवडणुकीत उतरण्यास पर्याय नाही, असे चित्र आहे.

तरी देखील धंगेकरांना सुरुवातीला भाजप मधल्या ब्राह्मण उमेदवार नसण्याच्या मुद्द्याचा वेगळा लाभ झाला होता. कसब्यातून बहुजन आमदार असा सुरुवातीला त्यांचा प्रचार झाला होता. पण तो प्रचार काही विशिष्ट काळापुरता चालला आणि नंतर थंडावला. कारण भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी खासदार गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आणि ब्राह्मण समुदायाच्या काही बैठका घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

संघाचे जुने काम

कसबा मतदारसंघात संघाचे फार जुने काम आहे. त्यामुळे संघाचे कार्यकर्ते ही हेमंत रासने यांच्या दृष्टीने मोठी शक्ती आहे. सुवर्णयुक्त तरुण मंडळ, सुवर्णयुग बँक ही त्यांची शक्तीस्थळे आहेत. पण ही शक्तीस्थळे असल्यामुळेच अखिल मंडई मंडळ, बाबू गेनू तरुण मंडळ, गुरुजी तालीम मंडळ ही मंडळी त्यांच्या बाजूने कितपत उभे राहतात, याविषयी शंका आहे.

 गणेश मंडळाभोवतीचे राजकारण

कसब्यातले राजकारण सार्वजनिक गणेश मंडळाभोवती फिरते ही बाब नवीन नाही. पण हेमंत रासने यांच्या पाठीशी दगडूशेठ हलवाई सुवर्णयुग तरुण मंडळ, कसबा गणपती मंडळ, जोगेश्वरी मंडळ यांचे कार्यकर्ते उभे राहतील. कारण ते संघ आणि भाजपशी संलग्न आहेत.

पोटनिवडणुकीत मतदान वाढविण्याचे आव्हान

हेमंत रासने यांच्यापुढे एक वेगळे आव्हान देखील आहे ते म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान!! कोणत्याही पोटनिवडणुकांमध्ये सहसा 40 – 45 % मतदान होते. हेमंत रासने हे गणपती मंडळाचे कार्यकर्ते संघ आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्या करवी जर मतदानाचे टक्केवारी 50 ते 52 % पुढे नेऊ शकले तर त्यांचा विजय सोपा होऊ शकतो.

 देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक लक्ष

स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील हे या निवडणुकीत लक्ष घालत आहेत. फडणवीस यांचे पुणे आणि चिंचवड कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांवर वैयक्तिक लक्ष आहे. त्यामुळे भाजप संघटनात्मक पातळीवर पूर्ण ताकदीनिशी उतरणार यात शंका नाही. त्यामुळे प्रयत्न केले तर मतांची टक्केवारी पोटनिवडणुकीत देखील 50 – 52 % पुढे नेणे अवघड ठरणार नाही. पण मतदानाची टक्केवारी वाढविणे हे आव्हान हेमंत रासने आणि भाजप कसे पेलते?, यावर विजयाचा फरक अवलंबून आहे.

Kasba Byelection : Congress facing political extinction, voting percentage is BJP’s challenge

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात