विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे 18 19 आणि 20 फेब्रुवारी 2023 रोजी नागपूर पुणे आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा हा दौरा मराठी प्रसार माध्यमांनी फक्त कसबा आणि चिंचवड या विधानसभांच्या पोटनिवडणुकीशी जोडला आहे. अमित शाह हे पोटनिवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार करणार नाहीत. Amit shah on 3 days political tour of nagpur, pune and kolhapur, will be a major boost for BJP in next municipal to assembly all elections
पण या दोन शहरांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांच्या दौऱ्याचा उपयोग करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. पण अमित शाह यांचा यांच्या या महाराष्ट्र दौऱ्याची व्यापकता तपशीलवार लक्षात घेतली, तर हा दौरा फक्त पोटनिवडणुकीपुरता नव्हे, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने तो दिग्विजयाची नांदी ठरणारा दौरा आहे हे दिसून येते.
अमित शाह हे आपल्या दौऱ्याची सुरुवात नागपुरातून करणार असून दीक्षाभूमी आणि रेशीम बागेला भेट देण्याबरोबरच लोकमत समूहाच्या सुवर्ण महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नागपुरात भाजप पक्ष बांधणीच्या दृष्टीने त्यांचा हा फार महत्त्वाचा दौरा आहे.
त्यानंतर ते पुण्यामध्ये दोन दिवस असून दैनिक सकाळ प्रायोजित सहकार परिषदेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा सहभाग असणार आहे.
काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींशीही त्यांचा संवादही होणार आहे.
पण अमित शहा यांच्या पुण्यातला मुख्य कार्यक्रम मोदी @20 या मराठी पुस्तकाच्या अनुवादाच्या प्रकाशानाचा असून मॉडर्न महाविद्यालयाच्या ग्राउंड वर यानिमित्ताने सायंकाळी 6.45 वाजता त्यांची भव्य सभा होणार आहे.
19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता शिवजयंतीच्या कार्यक्रमात अमित शाह हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी हिचे लोकार्पण करणार आहेत.
हा पुण्यातला मुख्य कार्यक्रम करून अमित शाह त्याच दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर जात असून तेथेही त्यांचे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण झाल्यानंतर अमित शाह हे कोल्हापूर मधील सुप्रसिद्ध लोहिया हायस्कूलच्या शताब्दी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सायंकाळी 4.30 वाजता कोल्हापूरमध्ये अमित शहा यांची भव्य विजय संकल्प रॅली भाजपने आयोजित केली असून ही महाराष्ट्र विजयाची नांदी असल्याची ग्वाही महाराष्ट्र प्रदेश भाजपने दिली आहे. महालक्ष्मी दर्शन आणि त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मार्गदर्शन आणि चर्चा हा अमित शाह यांचा महत्त्वाचा कार्यक्रम असणार आहे.
महाराष्ट्रातील या तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाद्वारे अमित शाह हे महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका तसेच त्यानंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या संघटनात्मक पायाभरणीचा आढावा घेऊन प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App