कसब्यातून भाजपचे हेमंत रासने, तर चिंचवड मधून अश्विनी जगताप निवडणुकीच्या मैदानात


प्रतिनिधी

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सस्पेन्स संपवत भाजपने कसब्यातून हेमंत रासने, तर चिंचवड मधून अश्विनी जगताप यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत. BJP’s Hemant Rasane from Kasba, and Ashwini Jagtap from Chinchwad in the election field

कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व विरोधी पक्षांना केले होते. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांचा प्रस्ताव नाकारला आहे. काँग्रेस कसब्यातून, तर राष्ट्रवादी चिंचवड मधून आपला उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.

अंधेरी पूर्व मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर तिथे झालेल्या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपने आपला उमेदवार उतरवला नव्हता. तीच साखळी पकडून भाजपने देखील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणे असे आवाहन केले. मात्र हे आवाहन फेटाळल्यामुळे आता भाजपने कसब्यातून हेमंत रासने आणि चिंचवड मधून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

हेमंत रासने हे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सुवर्णयुग तरुण मंडळाचे ते विश्वस्त आहेत. कसब्यातून आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक अथवा मुलगा कुणाला टिळक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. त्यातच कुणाला टिळक यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची शक्यता बळावली असल्याच्या बातम्याही दिल्या होत्या. परंतु, भाजपने टिळक कुटुंबा पैकी कोणाला उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना कसबा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

चिंचवड मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळणार अशा अटकळी बांधल्या जात होत्या. त्यातच जगताप कुटुंबामध्येच उमेदवारी बाबत मतभेद असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

BJP’s Hemant Rasane from Kasba, and Ashwini Jagtap from Chinchwad in the election field

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात