Karuna Munde : मुंडेंना माझ्या फ्लॅटमध्ये राहू द्या, मी निघून जाईन; करुणा मुंडेंचा टोला; म्हणाल्या – 6 महिन्यात त्यांची आमदारकी रद्द होणार

Karuna Munde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Karuna Munde  धनंजय मुंडे यांनी लाज सोडली आहे. त्यांचे मुंबईत मलबार हिल, हिरानंदानी मध्ये फ्लॅट आहे. माझा फ्लॅट हा देखील त्यांचाच आहे. त्यांना जर हिरानंदानी आणि मलबार हिलच्या फ्लॅटमध्ये रहावे वाटत नसेल तर त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये येऊन राहू शकतात, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. तर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात कधीच येणार नाही. 6 महिन्यांच्या आतमध्ये त्यांची आमदारकी रद्द होणार आहे. कालच त्यांना औरंगाबाद हायकोर्टाने 10 हजार रुपये दंडही ठोठावला आहे.Karuna Munde

करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीचा आणि माझे काहीच मतभेद नाहीत. धनंजय मुंडे यांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत हे विसरु नये. शासकीय बंगला न सोडण्यासाठी ते खोटे बोलत आहेत. मुंडे यांनी स्वत:चे फ्लॅट रेंटने दिले असतील तर त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी यावे मी दुसरीकडे जाईल. 8 वर्षे तुम्ही जिथे राहिले तिथे दुसऱ्या पत्नीसह येऊन राहू शकतात. मी माझ्या मुलांसह बाहेर जाईल.Karuna Munde



42 लाख छोटी रक्कम

करुणा मुंडे म्हणाल्या की, 42 लाख रुपयांचा दंड हा धनंजय मुंडे यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही, ही छोटीशी रक्कम आहे. ते 90 लाख रुपयांची घड्याळ घालतात. 5 लाख रुपयांचे बूट वापरतात. त्यांच्या वाहन चालकाला रोज 2 हजार रुपये जेवणासाठी दिले जातात. त्यांच्यासाठी 42 लाख रुपये म्हणजे मोठी गोष्ट नाही.

मुंडेंच्या पदाचा गैरफायदा घेतला

करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात कधीच येणार नाही. 6 महिन्यांच्या आतमध्ये त्यांची आमदारकी रद्द होणार आहे. कालच त्यांना औरंगाबाद हायकोर्टाने 10 हजार रुपये दंडही ठोठावला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी त्यांना क्लीन चीट देण्यात आली असेल.पण वाल्मीक कराड असो की सांगली मध्ये त्यांचा साला असो की गंगाखेडमध्ये त्यांची बहिण असो असे लोक गरिबांच्या जमिनी हिसकावून घेतात. यात वाल्मीक कराडची काय ताकद नाही, हे सर्व धनंजय मुंडे यांच्या राजकीय ताकदीवर सुरू होते हे आपण नाकारु शकत नाही.

..तर अजित पवारांचा पक्ष संपवणार

करुणा मुंडे म्हणाल्या की, अजित पवारांनी जर त्यांना मंत्रिपद दिले तर आम्ही अजित पवारांचा पक्ष संपवणार, महाराष्ट्रातील जनता घेऊन आम्ही मंत्रालयावर जाऊ, असे मनोज जरांगे यांनीही सांगितले असल्याने करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. अजित पवार हे चांगले व्यक्तीमत्व आहे. वंजारी समाजाच्या नव्या नेत्यांना संधी मिळावी, त्यासाठी अजित पवार प्रयत्न करत आहे. धनंजय मुंडे यांनी जर धनंजय मुंडेंना बाजूला केले आणि बाबरी मुंडे सारखे माणसं जवळ केली तर ते 2029 मध्ये मुख्यमंत्री होऊ शकतात.

Karuna Munde Slams Dhananjay Munde MLA Cancellation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात