Kangana Ranaut : कोरोनाच्या या संकटकाळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये काहीसं मंदीचं वातावरण अनुभवायला मिळत आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्र किंवा चित्रपट क्षेत्रही त्यापासून वाचलेले नाही. गेल्या वर्षभरामध्ये अनेक मोठ्या चित्रपटांना फटका बसला आहे. अनेक स्टार्सचे मोठे प्रोजेक्ट हे एकतर पुढं ढकलण्यात आले किंवा त्यांच्या रिलीजच्या डेट तरी बदलण्यात आल्या. जवळपास सर्वच स्टार्सने त्यांच्या तारखा बदलल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कंगना रनौतनं (Kangana Ranaut)तिच्या आगामी थलायवी या चित्रपटाच्या तारखांमध्ये काहीही बदल केलेला नाही. पूर्वनियोजित तारखेलाच म्हणजे 23 एप्रिललाच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याबाबत ट्विटरवर घोषणा करताना कंगनानं पुन्हा एकदा करण जोहर, आदित्य चोप्रासह बड्या सेलिब्रिटींवर खोचक शेरेबाजी केल्याचं पाहायला मिळालंय. Kangana Ranaut said, Biggies Hiding but I am coming to save Bollywood
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App