देवासाठी देवाकडे प्रार्थना! सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट ; चाहत्यांना दिला खास संदेश…


  • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल झाला आहे. 27 मार्च रोजी सचिननं ट्वीट करून, त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. Sachin Tendulkar Hospitalised a Week After Testing Positive for Covid-19

विशेष प्रतिनिधी

मुंबई: क्रिकेटचा देव सचिनसाठी चाहत्यांनी देवाकडे साकडे घातले आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तेव्हा कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्याचे सांगून होम क्वारंटाईन होत असल्याचे सचिननं सांगितले होते. मात्र आज शुक्रवारी त्यानं एक ट्विट करून वैद्यकिय सल्ल्यानुसार आता हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होत सचिननं ट्विट केलं की,”तुमच्या शुभेच्छा व प्रार्थनेचे आभार.

वैद्यकिय सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. काही दिवसांतच घरी पुन्हा येईल, अशी आशा आहे.

स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा. तसंच, सचिननं यावेळी विश्वचषक विजयाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

“सर्व भारतीय तसंच माझ्या टीममेट्सना आपल्या विश्वचषक विजयाच्या दहाव्या वर्षपूर्तीनिमित्त शुभेच्छा,” असं सचिननं ट्वीटमध्ये म्हटलंय.

काय म्हणाला सचिन

‘माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मला आशा आहे की काही दिवसातच घरी परत येईल. तसेच प्रत्येकाने स्वत: ची काळजी घ्यावी आणि सर्वांना सुरक्षित ठेवले पाहिजे असे ट्विट सचिनने केले आहे.

Sachin Tendulkar Hospitalised a Week After Testing Positive for Covid-19

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात