WATCH : नितीन गडकरींचा प्रगतीचा हायवे सुसाट, राज्यात रस्त्यांसाठी 2780 कोटींचा निधी

Nitin Gadkari sanctioned 2780 crore for road works in maharashtra

road works in maharashtra : कोणत्याही देशाच्या, राज्याच्या किंवा शहराच्या विकासासाठी पायाभूत सुविधा या अत्यंत महत्त्वाच्या असतात… पायाभूत सुविधांचा जेवढा अधिक विकास होईल, तेवढा त्याठिकाणचा विकास अधिक होत असतो. या पायाभूत सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचे असतात ते रस्ते. दळणवळणसाठी म्हणजेच प्रवासी किंवा मालवाहतुकीसाठी रस्ते चांगले उपलब्ध असल्यास त्याठिकाणी गुंतवणूक किंवा इतर विकास झपाट्याने होतो. त्यामुळे रस्ते हे अत्यंत महत्त्वाचे असतात. देशात मोदी सरकारनं कारभार सुरू केल्यापासून रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी देशभरात रस्त्यांच्या कामाच्या माध्यमातून उत्तम दर्जाच्या रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. त्यांच्या कामाचा झपाटा पाहता सगळीकडेच रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरुयत. नुकतेच त्यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांसाठी मोठे बजेट मंजूर केले आहे. विविध रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी गडकरींनी जवळपास 2780 कोटींच्या निधीला मंजुली दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून गडकरींनी ही घोषणा केलीय… नितीन गडकरी यांनी #PragatiKaHighway हा हॅशटॅगही वापरला. म्हणजेच देश प्रगतीच्या हायवेवर मार्गक्रमण करत असल्याचं गडकरींनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय. Nitin Gadkari sanctioned 2780 crore for road works in maharashtra

हेही वाचा…

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था