बॉलीवूडची ‘क्वीन’ प्रेमात, अभिनेत्री कंगना रनौतने केला रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा, लवकरच करणार जाहीर


कंगना रनौत तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. ती कोणत्याही विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. आता कंगनाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे की, ती कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे. कंगनाच्या या खुलाशामुळे तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. Kangana ranaut reveal her relationship status says you will know about my partner soon


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कंगना रनौत तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. ती कोणत्याही विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. आता कंगनाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे की, ती कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे. कंगनाच्या या खुलाशामुळे तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

इतकंच नाही तर कंगनाने असंही सांगितलं की, तिला पुढच्या ५ वर्षांत लग्न करायचं आहे आणि मुलं होण्याची आशा आहे. तिच्या बॉयफ्रेंडबद्दलची उर्वरित माहिती ती लवकरच देणार आहे. नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने हा खुलासा केला आहे.

कंगना लग्न करण्याच्या विचारात

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने याचा खुलासा केला आहे. खरं तर, कंगनाला विचारण्यात आलं होतं की, ती पुढील ५ वर्षांत स्वत:ला कुठे पाहते. यावर ती म्हणाली, “मला लग्न करायचे आहे आणि नंतर मुलेही हवी आहेत. येत्या ५ वर्षांत मी स्वत:ला आई म्हणून पाहते.”लवकरच करणार जाहीर

कंगनाला विचारण्यात आले की, ती आई आणि पत्नी होण्यासाठी प्रोजेक्टवर काम करत आहे का? तर अभिनेत्री हसली आणि म्हणाली, हो. त्यानंतर कंगनाला तिच्या जोडीदाराबद्दल विचारले असता ती म्हणाली, तुम्हाला लवकरच कळेल. जेव्हा कंगनाला पुन्हा विचारण्यात आले की, ती प्रेमात हॅपी प्लेसमध्ये आहे का, तेव्हा ती म्हणाली, “हो, नक्कीच आणि तुम्हाला लवकरच बाकीचे तपशील कळतील.”

कंगनाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री असण्यासोबतच ती एक प्रोड्युसरदेखील आहे. अलीकडेच कंगनाने तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत टिकू वेड्स शेरू या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. कंगनाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Kangana ranaut reveal her relationship status says you will know about my partner soon

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात