ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा; शिक्षणाचा नवा दीपस्तंभ!!

Jyoti Savitri

विशेष प्रतिनिधी

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पैतृक गाव पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन संपन्न झाले. मुलींची पहिली शाळा सुरू करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म-द्विशताब्दी वर्ष शुभारंभानिमित्त उभारलेली ही राज्यातील पहिली पथदर्शक मॉडेल शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत सामाजिक समता आणि सक्षमीकरणाला चालना देणार आहे.Jyoti Savitri Zilla Parishad School; A new beacon of education!!

– शाळेची ठळक वैशिष्ट्ये :

– क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समताधिष्ठित आणि शिक्षणप्रधान विचारांना साकार करणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम



– बालवाडी ते इयत्ता 12 वीपर्यंत CBSE अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षण, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा उपलब्ध

– सुमारे 12 एकर जागेवर उभारलेल्या या प्रकल्पासाठी 2022 मध्ये शासनाकडून जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून शाळेला आवश्यक शासकीय मान्यताही देण्यात आली आहे

– 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून बालवाडी ते इयत्ता 2 रीपर्यंतचे वर्ग सुरू होत असून सध्या सुमारे 260 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे

– पुढील वर्षापासून इयत्ता 6 वीपासून निवासी शाळा आणि प्रारंभी 40 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा

– या प्रकल्पासाठी CSR अंतर्गत ₹21 कोटी, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद निधीतून ₹15 कोटी असा एकूण मोठा निधी उपलब्ध करून अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत

Jyoti Savitri Zilla Parishad School; A new beacon of education!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात