प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विविध खात्यांमध्ये शिंदे – फडणवीस सरकारने कंत्राटी भरती सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवारांनी त्यावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना संबंधित कंत्राटी भरतीचा जीआर मागच्याच सरकारचा असल्याची आठवण करून दिली आहे, पण तरी देखील त्यांचा विरोध थांबलेला नाही. Jayant Patil opposes contract recruitment today
या पार्श्वभूमीवर कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा आढावा घेतल्यावर काही वेगळ्याच बाबी समोर आल्या. त्या म्हणजे मुळात कंत्राटी भरतीचा निर्णय 20 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने घेतला होता आणि त्या सरकारमध्ये जयंत पाटील स्वतः अर्थमंत्री होते. विलासरावांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय अर्थमंत्री म्हणून जयंत पाटलांनी राबविला होता. मात्र आज तेच जयंत पाटील सत्तेबाहेर असताना शिंदे – फडणवीस सरकारच्या कंत्राटी भरतीला विरोध करत आहेत.
महाराष्ट्रावर आर्थिक ताण येतो त्यामुळे झिरो बजेट सादर करावे ही संकल्पना विलासरावांनी आणि सुशील कुमार शिंदे यांनी मांडली. ती जयंत पाटलांनी पुढे कॅरी फॉरवर्ड केली आणि त्यातूनच पोलीस भरती, शैक्षणिक भरती, आरोग्य भरती इतकेच काय पण शासकीय पातळीवरच्या महत्त्वाच्या पदांवरची काही ठिकाणची भरती देखील कंत्राटी स्वरूपात व्हायला लागली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात 15 वर्षे चालले त्यावेळी कंत्राटी भरतीच होत होती. पण मुळात भरतीचेच प्रमाण एवढे कमी होते, की जी भरती होते आहे, ती पदरात पाडून घ्या अशी जनसामान्यांची भावना झाली आणि त्यावेळी विरोधी पक्ष देखील तितकासा प्रभावी नव्हता.
महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने देखील कंत्राटी भरतीचा पाठपुरावा करून जीआर काढला. आत्ताचे शिंदे – फडणवीस सरकार त्या जीआरची फक्त अंमलबजावणी करते आहे आणि त्यामध्ये आता अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले आहे. अर्थमंत्री म्हणून ते कंत्राटी भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करत आहे या पलीकडे त्या निर्णयात बाकी काही नाही तरी देखील जयंत पाटील सत्तेबाहेर राहून जयंत पाटील आणि रोहित पवार कंत्राटी भरतीला विरोध करत आहेत.
काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातील कंत्राटी भरती
शैक्षणिक क्षेत्र :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App