प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कथित बंडा बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते “डबल गेम” करत असल्याचेच स्पष्ट होत आहे. कारण जयंत पाटील म्हणतात, 9 मंत्री सोडून बाकीच्या आमदारांना दरवाजे उघडे आहेत, तर शरद पवार म्हणतात, अजित पवारांशी मतभेद असले, तरी अजित पवार परके नाहीत आणि मी कोणत्याही आमदाराच्या अपात्रतेच्या मार्गाने जाणार नाही…!! हीच ती राष्ट्रवादी काँग्रेसची डबल गेम आहे…!! किंबहुना पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाच आमदार संख्या घटण्याची भीती वाटते आहे.Double game: Jayant Patil says, except 9 ministers, open doors for rest of the MLAs
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कायदेशीर कारवाई करत अजितदादांबरोबर शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांच्या अपात्रतेचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे पाठवले. त्यांना ई-मेल आणि व्हाट्सअप केला. तसेच संबंधित मंत्री मंत्र्यांना देखील त्याच मार्गाने अपात्रतेचा इशारा दिला. कालच्या आणि आजच्या पत्रकार परिषदेत जयंत पाटलांनी त्याचा सविस्तर खुलासा देखील केला. पण हा खुलासा करतानाच जयंत पाटलांनी अजितदादांसोबत शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांना दरवाजा बंद पण बाकीच्या पण शपथविधीला हजर राहिलेल्या बाकीच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना राष्ट्रवादीचा दरवाजा खुला असल्याचे वक्तव्य केले. याचा अर्थ 54 आमदारांपैकी 9 मंत्री आमदार म्हणून अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव जयंत पाटलांनी दिला. त्यामुळे आमदारांची संख्या घटून ती 45 होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये मात्र आपण पक्षाची नव्याने बांधणी करू. अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे, पण अजित पवार परकेही नाहीत. कोणी आपल्याशी चर्चा करायला, बोलायला आले तर त्याचा विचारही करू, असे वक्तव्य केले. त्याचवेळी पवारांनी आपण कोणत्याही आमदारांच्या अपात्रतेच्या मार्गाने जाणार नाही. म्हणजेच कोणावरही कायदेशीर कारवाई करण्याच्या फंदात पडणार नाही, असे वक्तव्य करून ही “डबल गेम” असल्याचेही सूचित केले.
कारण राष्ट्रवादीच्या मर्यादित आमदार संख्येत पक्षाच्याच आमदारांच्या अपात्रतेमुळे आणखी घट होण्याची भीती पवारांना वाटत आहे आणि आमदारांच्या संख्येत घट झाली की विधिमंडळातली वैधानिक पदे, विरोधी पक्षनेतेपद तसेच अन्य पदे यांना धोका उत्पन्न होण्याची भीती देखील पवारांना वाटते. त्यामुळे जयंत पाटलांनी जरी 9 मंत्र्यांच्या आमदारकीच्या अपात्रतेची नोटीस दिली असली तरी त्या मार्गाने आपण जाणार नसल्याचा खुलासा पवारांनी कराडमध्ये करून राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष एकच ठेवण्याचा प्रयत्न केला. पण या एकसंधतेत आमदार संख्या घटण्याची भीती विशेषत्वाने दडल्याचेही स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App