जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंवर विश्वास, राणेंवर टीका आणि मोदींवर शंका!!

प्रतिनिधी

जालना : मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवली सराटीत उपोषणाला बसत आहेत. मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी काही राजकीय विधाने केली आहेत. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे पण त्यांना कोणीतरी अडवत आहे. कोणीतरी मराठा आरक्षणाच्या विरोधात येत आहे. ते लवकरच समोर येईल, असा दावा जरांगे पाटलांनी केला आहे.Jarange Patil trusts Eknath Shinde, criticizes Rane and doubts Modi!!

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवताना जरांगे पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली आहे पंतप्रधान मोदींना एक फोन लावून द्या. त्यांचा एक फोन मुख्यमंत्री आणि तो उपमुख्यमंत्र्यांना येऊ द्या तर लगेच मराठा आरक्षण मिळेल, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केले.



जरांगे पाटलांनी मोदींवर शंका उपस्थित केल्यामुळे त्यांच्या उपोषणातला राजकीय अँगल समोर आला आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजी राजे अंतरवालीत पोहोचत आहेत. अंतरवाली मध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यायला बंदी आहे पण संभाजी राजे आणि उदयनराजे आमचे राजे आहेत. त्यामुळे त्यांची आम्ही भेट घेऊन आशीर्वाद घेऊ, असे वक्तव्य देखील जरांगे पाटलांनी केले.

त्याचवेळी जरांगे पाटलांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र घ्यायची लाज वाटते, तर ज्या शेतीवर बंगले बांधले ती शेती विकून टाका असे शरसंधान जरांगे पाटलांनी नारायण राणे यांच्यावर सोडले. मराठा आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाला सुरुवात करतील, असेही जरांगे पाटलांनी स्पष्ट केले.

Jarange Patil trusts Eknath Shinde, criticizes Rane and doubts Modi!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात