जनसंघाच्या उत्तमराव पाटलांना उपमुख्यमंत्री केले, पवार खोटे बोलले; राम नाईकांनी वाभाडे काढले!!

प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 1977 सालच्या शरद पवारांच्या सरकार स्थापनेवरून जे राजकीय घमासन सुरू आहे, त्यात शरद पवार चक्क खोटे बोलले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.Jana Sangh’s Uttamrao Patil made Deputy Chief Minister, Pawar lied; Ram Naik took off!!

कारण शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्राथमिक शाळेतले विद्यार्थी संबोधताना आपण 1977 मध्ये जनसंघाच्या उत्तमराव पाटलांना उपमुख्यमंत्री केले होते, असे वक्तव्य केले आणि हेच त्यांचे वक्तव्य खोटे असल्याचे त्यावेळचे आमदार भाजपचे जेष्ठ नेते राम नाईक यांनी सांगून पवारांचे अक्षरशः वाभाडे काढले.



राम नाईक यांनी शरद पवारांचा सगळा इतिहास बाहेर काढला पवार कसे खोटे बोलले, याची साक्ष त्यांनी विकिपीडियाच्या सहाय्याने काढली. पवार – फडणवीस वादात राम नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने परखड सत्य सांगून पवारांसारख्या दुसऱ्या ज्येष्ठ नेत्याचे वाभाडे काढणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातली वेगळी दुर्मिळ घटना ठरली आहे. कारण राम नाईक 1977 मध्ये जनता पक्षाचे आमदार होते.

पवार – फडणवीस यांच्यातला वाद पुढे आल्यानंतर राम नाईक यांनी आवर्जून आपल्या घरी पत्रकारांना बोलावले आणि त्यांनी 1977 मधल्या परिस्थितीची माहिती दिली. राम नाईक म्हणाले, की पवार आणि फडणवीस यांच्यात जो वाद झाला, त्याविषयी काही माहिती सांगण्यासाठी मी आपल्याला बोलावले आहे. मी त्यावेळेला आमदार होतो. माझे सध्या वय 89 आहे आणि पवारांचे वय 82 आहे. त्यामुळे पवारांनी उत्तमराव पाटलांविषयी जे सांगितले, त्याबद्दल मी बोलणार आहे. पवारांच्या वक्तव्यातून उत्तमराव पाटलांना आपण उपमुख्यमंत्री नेमले होते, असे माझ्या वाचनात आले. पण पवार चुकत आहेत की मी चुकतोय, हे मी विकिपीडियाच्या सहाय्याने पण तपासले आणि त्यात लक्षात असे आले की पवारांनी उत्तमराव पाटलांना उपमुख्यमंत्री नेमले नव्हते, तर सुंदरराव सोळंकेना उपमुख्यमंत्री केले होते. उत्तमराव पाटलांना त्यावेळेला महसूल मंत्री होते. पवारांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने अशी चुकीची माहिती उघडपणे सांगणे ही मला गंभीर चूक वाटली आणि म्हणून त्याचा खुलासा करण्यासाठी मी आपल्याला बोलवले, असे राम नाईक पत्रकारांना म्हणाले.

सुंदरराव सोळंके उपमुख्यमंत्री

1977 च्या मंत्रिमंडळाच्या उल्लेखात पवारांबरोबर काँग्रेस मधून फुटलेलेच सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते, याची आवर्जून आठवण राम नाईक यांनी करून दिली. पण पवारांनी आपण उत्तमराव पाटलांना उपमुख्यमंत्री नेमले होते, अशी खोटी माहिती सांगितली.

 1977 चा राजकीय पाढा

शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसचे 40 आमदार फोडून त्यावेळच्या जनता पक्षाबरोबर जाऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्याविषयीचा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्रात राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंच्या उठावाचा 20 जून चा दिवस गद्दार दिवस साजरा केल्याने सुरू झाला. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी गद्दारी नेमकी कोणी केली याचा उल्लेख करताना शरद पवारांच्या 1977 सालच्या सरकार स्थापनेचा राजकीय पाढा वाचून दाखवला होता. फडणवीसांना प्रत्युत्तर देताना पवारांनी आपल्याबरोबर त्यावेळी जनसंघ पण होता आणि उत्तमराव पाटलांना उपमुख्यमंत्री केले होते, अशी माहिती सांगितली होती. पण ही माहिती तद्दन खोटी असल्याचे राम नाईक यांनी पुराव्यानिशी समोर आणले आणि पवार पुन्हा एकदा खोटे बोलल्याचे सिद्ध केले.

Jana Sangh’s Uttamrao Patil made Deputy Chief Minister, Pawar lied; Ram Naik took off!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात