भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला; अज्ञातांनी झाडल्या गोळ्या; आझाद सुरक्षित


वृत्तसंस्था

लखनौ : भीम आर्मी पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारनपुर नजीक घडली आहे. पाच जणांच्या अज्ञात टोळक्याने चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर बेछूट गोळीबार केला. पण या हल्ल्यातून चंद्रशेखर आझाद थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या कमरेला एक गोळी चाटून गेली आहे. आझाद यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Attack on Bhim Army chief Chandrashekhar Azad

गोळीबार नेमका कोणी केला आहे, याची माहिती नसली तरी आमच्यातल्या काही लोकांनी हल्लेखोरांना ओळखले आहे, अशी माहिती स्वतः आझाद यांनीच रुग्णालयात उपचार सुरू असताना एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. हल्लेखोरांची गाडी सहारनपूरच्या दिशेने पळून गेली आम्ही यू टर्न घेतला. आमची गाडी एकटीच होती. माझ्याबरोबर जे डॉक्टर होते, त्यांना कदाचित गोळी लागली असेल, असे आझाद यांनी सांगितले.

चंद्रशेखर आझाद यांची प्रकृती सध्या ठीक आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सीएचसीमध्ये नेण्यात आले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Attack on Bhim Army chief Chandrashekhar Azad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात