प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. तो कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती कारवाईचा इशारा दिला आहे. Intensity of agitation in Solapur, Kolhapur, Beed, Dhule; ST Corporation warns employees of termination of service!
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी कृती समितीबरोबर बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. तर काही मागण्यांचा दिवाळीनंतर विचार करण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यानंतर एसटी कर्मचारी कृती समितीनेही आंदोलन मागे घेत असल्याच जाहीर केले. मात्र आजही राज्यात अनेक एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी कृती समितीबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलन मागे घेण्यास एसटी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. या कर्मचाऱ्यांना आंदोलन असेच सुरू राहील तर सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.
Farmers Protest : तुम्ही शहराचा श्वास कोंडत आहात, लोकांनी व्यवसाय बंद करावेत का?, सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला फटकारले
विशेषतः सोलापूर, कोल्हापूर, बीड, धुळे या जिल्ह्यांतील विविध एसटी डेपोच्या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जोर तीव्र आहे. राज्यात इतरही ठिकाणीही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील शेगाव डेपो मध्ये एसटी कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली आहे. या आंदोलनामुळे फटका एसटी सेवा राज्यात सुरळित सुरु झालेली नाही. तेव्हा यावर आता कसा तोडगा निघणार, आंदोलन किती दिवस चालणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण मागे घेतलेले असतांनासुद्धा काही आगारांमध्ये काही कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यामुळे वाहतूक बंद होत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात कामकाजात गैरशिस्तपणा, महांडळाची हाणी, जनेतेची गैरसोय, कामबंध करण्याबाबत चिथावणी देणे, कायद्याबाबत तरतूदींचे उल्लंघन करणे, प्रशासकीय आदेशांचा भंग करणे, या आरोपांखाली शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती अंतर्गत सेवा समाप्तीच्या कारवाईचा इशारा व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App