वृत्तसंस्था
अहमदनगर : महाराष्ट्राचा प्राणी असलेल्या ‘शेकरु’ हा देखणा प्राणी दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालला आहे. उडत्या खारी किंवा इंडियन जायंट म्हणून त्यांना ओळखले जाते. परंतु, यंदा केलेल्या शिरगणतीत त्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले.Indian Giant squirrels (Shekru) Numbers are increased ; 97 were found in Bhandardara Harishchandragad Sanctuary
महाराष्ट्रात भीमाशंकर, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, आजोबा डोंगररांगांमध्ये, माहुली, वासोटा, मेळघाट, ताडोबात शेकरू आढळतात. शेकरू हा झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलांत त्यांचे वास्तव्य असते.
यंदा हरिश्चंद्रगड अभयारण्यात 97 शेकरू आढळले आहेत. ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा दीडपट अधिक आहे. या अभयारण्यात शेकरूंची 396 घरटी आढळली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेकरू नवीन घरटी बनवतात.
यामुळे शेकरूंची गणना मे मध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यात शेकरूंची संख्या प्राप्त झाली आहे. हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते. त्यामुळे अंतिम आकडा हा जूनमध्ये मिळेल, असे वनक्षेत्रपाल डी. डी.पडवळ यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात शेकरू
१) वजन दोन ते अडीच किलो २) लांबी अडीच ते तीन फूट ३) डोळे गुंजीसारखे लाल असतात. ४) त्याला मिशा असतात. अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांब शेपूट असते. ५) शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. ६) एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते. ७) 15 ते 20 फुटांची लांब उडी मारू शकते. ८) विविध फळे व फुलांतील मध हे त्याचे खाद्य असते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App