विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raosaheb Danve आम्हाला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल त्यामुळे आम्हाला सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची गरजच पडणार नाही, असा दावा भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. जर अपक्ष आमदाराला महायुतीला पाठिंबा द्यायचा असेल तर ते देऊ शकतात, आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही रावसाहेब दानवे म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे दानवे म्हणाले.Raosaheb Danve
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचा कौल आता ईव्हीएममध्ये बंद झाला आहे. उद्या निवडणूक आयोगाचे कर्मचारी जनतेचा फैसला सुनावतील. अवघ्या काही तासांवर आलेला हा जनादेश कसा असेल? हे कुणालाच ठावूक असणार नाही. सत्तास्थापनेसाठी आवश्यक आकडा जुळवण्यासाठी दोन्ही आघाडींचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे. मात्र, याबाबत बोलताना रावसाहेब दानवे यांनी आम्हाला अपक्षांची गरज पडणार नसल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
लोकसभेत काँग्रेसने एक नरेटीव सेट केला होता, त्यामुळे आम्हाला फटका बसला. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने येणार असून आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. बहुमत मिळत असेल तर अपक्ष आमदारांना संपर्क साधण्याची गरज काय? जर अपक्ष आमदाराला पाठिंबा द्यायचा असेल तर ते देऊ शकतात. आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही दानवे म्हणाले.
शिंदेंचा निर्णय तोच कार्यकर्त्यांचा निर्णय
वाढलेल्या मतदानाचा टक्का महिलांचा आहे. लाडकी बहीण आमच्या पाठीशी आहे. लोकसभेला जी परिस्थिती होती ती आता सुधारली आहे. भाजपला कुठेही नुकसान नाही. एकनाथ शिंदे हे पूर्णपणे भाजप आणि मित्र पक्षांसोबत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते काहीही बोलत असले, तरी त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो निर्णय असेल, तोच कार्यकर्त्यांचा असेल, असे रावसाहेब दानवे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App