पुण्यातील खराडी येथील एका व्यापाऱ्यास स्टीलची भांडी पुरविणाऱ्या पुरवठादारने स्टीलचे भाव वाढणार आहे, तुम्ही आत्ताच स्टीलची ऑर्डर बुकिंग करा असे सांगत ५० लाख रुपये पाठविण्यास लावून त्याची सदर रकमेची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -पुण्यातील खराडी येथील एका व्यापाऱ्यास स्टीलची भांडी पुरविणाऱ्या पुरवठादारने स्टीलचे भाव वाढणार आहे, तुम्ही आत्ताच स्टीलची ऑर्डर बुकिंग करा असे सांगत ५० लाख रुपये पाठविण्यास लावून त्याची सदर रकमेची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.Increasing price of steel material say supplayer to businessman and cheated him ५० lakhs rupees
याप्रकरणी रामलखन प्रजापती (वय-४०,रा.रायपुर, छत्तीसगड) या आराेपीवर चंदननगर पाेलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंकज राजकुमार अगरवाल (वय-४३) यांनी तक्रार दिली आहे. रामलखन प्रजापती हा पंकज अगरवाल यांच्या ओळखीचा असून त्याने अगरवाल यांना माेबाईलवर फाेन करुन स्टीलचे भाव लवकरच वाढणार आहेअसे सांगितले.
तुम्ही आत्ताच स्टीलची ऑर्डर बुकिंग करुन ठेवा म्हणून त्याने स्टीलचे मालाकरिता अडव्हान्स बुकिंग म्हणून त्यांच्याकडून ५० लाख रुपये लुसेंट स्टील प्रा.लि. यांचे रायपुर, छत्तीगड येथील बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले. परंतु त्यानंतर अगरवाल यांना स्टीलचा माल तसेच दिलेले ५० लाख रुपये परत न करता त्यांची सदर रकमेची फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत चंदननगर पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक सुनील थाेपटे पुृढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App