या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्स यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.In the end, Mard’s fight was a success. Every resident doctor will get Rs 1 lakh 21 thousand for Kovid patient service
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ लाख २१ हजार रुपये देण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यभरात निवसी डॉक्टर्स आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. संपूर्ण राज्यभर हा संप झाल्यामुळे आरोग्यसेवेवर ताण पाडण्याची शक्यता होती.
त्यामुळे सरकारने मार्ड संस्थेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. तसेच सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.याच आश्वासनाची पूर्तता म्हणून सरकारने वरील निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर्स यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यशासनाच्या या निर्णयामुळे आम्हाला रुग्णसेवा करण्याची प्रेरणा मिळणार आहे, अशी भावना महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App