अनिल देशमुखांवरील निकालात आमची बाजू ऐकून घेतली नाही, ईडीनेच केली उच्च न्यायालयात तक्रार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची संपत्ती जप्त करू नये, असा निर्णय देण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नसल्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी) उच्च न्यायालयात केली आहे.In Anil Deshmukh case court did not hear our side in the verdict, ED filed a complaint in the High Court

ही संपत्ती अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर असून, त्यांनी ईडीच्या कारवाईला विरोध करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुढील आदेशापर्यंत आरती देशमुख यांची संपत्ती जप्त करू नये, असा आदेश न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत दिला आहे.



न्या. जी. एस. पटेल प्रमुख असलेल्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याची परवानगी ईडीला दिली आणि या प्रकरणाची सुनावणी जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे. उच्च न्यायालयाने हा आदेश देण्यापूर्वी तपास यंत्रणेचा युक्तिवाद ऐकून घेतला नाही,

असे ईडीच्या वतीने अतिरिक्त महान्यायाभिकर्ता अनिलसिंह यांनी न्यायालयात सांगितले. शुक्रवारी सुनावणीत या मुद्यावरील ईडीचा युक्तिवाद होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

In Anil Deshmukh case court did not hear our side in the verdict, ED filed a complaint in the High Court

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात