वृत्तसंस्था
शेवगाव: नापिकीमुळे राज्यात शेतकरी जीवन संपवत असताना आताएसटीचे कर्मचारी आत्महत्या करू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका चालकाने आज आत्महत्या केली आहे.in Ahmednagar Driver commits suicide by hanging himself in the ST depot of shevgaon
परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे ,असे त्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन त्यांनी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीस आली.
आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून एसटी कर्मचाऱ्यांना कोणी वाली नसल्याचे यानिमित्ताने उघड होत आहे.
विशेष प्रतिनिधी
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App