2024 मध्ये पवारांचा बारामती बालेकिल्लाही उध्वस्त होईल!; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

प्रतिनिधी

बारामती : आत्तापर्यंत देशात बड्या बड्या नेत्यांचे बालकिल्ले उध्वस्त झाले आहेत. त्या तुलनेत बारामती हा काही फार मोठा बालेकिल्ला नाही. 2024 मध्ये भाजप पवारांचा बारामतीचा बालेकिल्ला उध्वस्त करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. बारामतीच्या दौऱ्यावर त्यांनी “मिशन बारामतीची” घोषणा केली आहे. In 2024 Pawar’s Baramati citadel will also be destroyed

बारामतीत पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. बारामती मतदारसंघातल्या 40 – 45 % भाग आजही उपेक्षित आहे. जनतेपर्यंत केंद्रातल्या योजना मुद्दामून पोचू दिल्या जात नाहीत. त्यांची अडवणूक केली जाते. भाजप या विषयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून केंद्रातल्या सर्व योजना गरीबातल्या गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीच्या प्रभारी आहेत. त्यांचा पाच-सहा वेळा प्रवास होईल. प्रत्येक वेळी भाजपच्या मजबुती करणाचाच विचार केला जाईल. आजही भाजपमध्ये 1000 कार्यकर्ते सहभागी होत आहेत. यापेक्षा मोठमोठे प्रवेश भाजपमध्ये होणार आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शरद पवारांनी कितीही प्रयत्न केला तरी यावेळी बारामतीचा गड उध्वस्त होणारच. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या हे माहित नाही. पण बारामतीचा खरा विकास हा त्यांच्या परिवारापुरता झाला आहे. 40 – 45 % जनता विकासापासून वंचितच आहे. हा विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भाजप केंद्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारेल असे बावनकुळे म्हणाले.

In 2024 Pawar’s Baramati citadel will also be destroyed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात