पवार – राहुलला मुसलमानांची मते हवीत पण AIMIM नको, पण लक्षात ठेवा तुमच्यापेक्षा आम्ही ताकदवान; इम्तियाज जलीलांचा इशारा

प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : शरद पवार आणि राहुल गांधींना मुसलमानांची मते हवीत, पण शेजारी बसायला इम्तियाज जलील नको, पण लक्षात ठेवा तुमच्या I.N.D.I. आघाडीतल्या घटक पक्षांपेक्षा AIMIM ची ताकद जास्त आहे, असा गंभीर इशारा AIMIM चे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. Imtiaz jalil warns sharad pawar and rahul gandhi about muslim votes

AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची इच्छा असूनही I.N.D.I आघाडीने त्यांच्या पक्षाला आपल्या आघाडीत स्थान दिले नाही. ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी कालच महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले. 454 विरुद्ध 2 अशा मतांनी महिला विधेयक लोकसभेत संमत झाले. मोदी सरकारला हे विधेयक एकमताने संमत करून घ्यायचे होते पण ते AIMIM च्या दोन खासदारांमुळे शक्य झाले नाही.

या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी शरद पवार आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. पवार आणि गांधी या दोन्ही नेत्यांना मुसलमानांची फक्त मते हवी आहेत, पण शेजारी बसलेला इम्तियाज जलील त्यांना नको आहे, असे शरसंधान त्यांनी साधले. पण त्याच वेळी त्यांनी गंभीर इशाराही दिला.

देशातल्या 60 पेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतांची संख्या निर्णयक आहे. त्या मतदारसंघांमध्ये AIMIM ताकद वाढती आहे. तुमच्या I.N.D.I आघाडीतल्या अनेक घटक पक्षांपेक्षा आमची ताकद जास्त आहे. भाजपला पराभूत करायचे असेल, तर आमची ताकदच उपयोगी पडेल. त्याकडे दुर्लक्ष केले, तर तुम्हाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.

औरंगाबाद मध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तर ठीक नाहीतर आपण स्वतंत्र लढू आणि आमची ताकद त्यांना दाखवून देऊ, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी महाराष्ट्रात एक मोठी राजकीय चर्चा होती, ती म्हणजे इम्तियाज जलील हे 2024 मध्ये औरंगाबाद मधून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील. या संदर्भात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी इम्तियाज जलील यांची गुप्त चर्चाही झाली होती, पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही चर्चा थांबली आणि आता इम्तियाज जलील यांनी शरद पवारांना गंभीर इशारा दिला. या इशारेतून या इशाऱ्यानंतर औरंगाबादचे राजकारण कसे वळण घेते??, पवार हा इशारा कितपत गंभीरपणे घेतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Imtiaz jalil warns sharad pawar and rahul gandhi about muslim votes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात