यशवंतरावांच्या मार्गाने सत्तेत गेलो, तर बिघडलं कुठं??; अजितदादांचा शरद पवारांना बोचरा सवाल!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात अजित पवार गटाची कोंडी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रथमच बऱ्याच दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट शरद पवारांना टोले हाणले आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गाने सत्तेमध्ये गेलो, तर बिघडलं कुठं??, असा बोचरा सवाल अजितदादांनी आज केला. त्याचवेळी त्यांनी इतर नेत्यांची ही उदाहरणे दिली. If I came to power through Yashwantrao’s path, then it has gone bad

रायगड जिल्ह्यातील कर्जत मधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात अजित पवारांनी सत्तेमध्ये जाण्याचे पुन्हा समर्थनच केले. बहुमताचा आदर करून निर्णय घेतले पाहिजेत. यापूर्वी जयललिता, नितीश कुमार ममता बॅनर्जी यांनी बहुमताचा आदर करूनच आपापला निर्णय घेतला होता. आम्ही देखील यशवंतराव चव्हाणांच्या मार्गाने त्यांचे विचार घेऊन सत्तेवर गेलो, तर बिघडलं कुठं??, असा बोचरा सवाल अजितदादांनी शरद पवारांना केला.

महाराष्ट्रात सध्या वेगळे वातावरण आहे. विरोधक काही बाही बोलत आहेत. पण आम्ही त्यांना उत्तर देण्याच्या फंदात पडत नाही. आम्ही कामातून उत्तर देऊ. राज्यात सर्व समाजांमध्ये सलोखा राहावा असाच आमचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांमध्ये आम्ही कमी पडणार नाही. उगाच हातावर हात ठेवून विरोधासाठी विरोध करणे आमची भूमिका नाही. जनतेची कामे करण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये गेलो यात आमचे काही चुकले नाही, असा टोलाही अजित पवारांनी शरद पवारांना हाणला.

पण जयललिता, ममता बॅनर्जी वगैरे नेत्यांची उदाहरणे अजितदादांनी पहिल्यांदाच दिलेली नाहीत. यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या कार्यक्रमात, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या षण्मुखानंद हॉलच्या मेळाव्यातही उदाहरणे त्यांनी याच नेत्यांची उदाहरणे दिली होती. जयललिता, ममता बॅनर्जी वगैरे नेत्यांनी पूर्ण बहुमत मिळवून अनेकदा सत्ता मिळवली. तसे पूर्ण बहुमत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही मिळवता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी असूनही ती कधी साधता आली नाही, असे टोले त्यांनी अजितदादांनी शरद पवारांना या आधी लगावले होते.

मात्र, आजच्या रायकडच्या कार्यक्रमात परिस्थितीनुसार राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. ते घेतले तर काही बिघडत नाही. या तत्त्वाचे समर्थन करण्यासाठी अजितदादांनी जयललिता ममता बॅनर्जी नितीश कुमार आणि यशवंतराव चव्हाण यांची नावे घेतली.

If I came to power through Yashwantrao’s path, then it has gone bad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात