विशेष प्रतिनिधी
इचलकरंजी : इचलकरंजीच्या सभेत आला पाऊस; भाषण करताना शरद पवार झाले खुश!! Ichalkaranji in rain sharad Pawar happy
शरद पवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज इचलकरंजीला होते. तिथे त्यांच्या सभेत रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे पवार खुश झाले आणि निकाल चांगला लागेल, असे म्हणाले.
2019 मध्ये साताऱ्याच्या सभेत असाच पाऊस झाला होता, पण छत्र्या उपलब्ध असताना देखील पवार मुद्दामून तिथे पावसात भिजत भाषण करत राहिले. त्यांचा भाषणाचा फोटो व्हायरल झाला आणि त्यामुळे निकाल फिरला, असा दावा माध्यमांनी आणि पवारनिष्ठांनी चालविला.
Narendra Modi शिवतीर्थावर मोदींची गर्जना- मविआचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम, त्यांची विचारधारा महाराष्ट्राचा अपमान करणारी
वास्तविक 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना फक्त 54 आमदार निवडून आले होते. परंतु निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे फिरले. त्यांनी महायुती सोडली. महाविकास आघाडीतून ते मुख्यमंत्री झाले आणि त्याचे क्रेडिट पवारांना मिळाले होते. पण 54 आमदार निवडून आल्याचे क्रेडिट मात्र पवारांच्या साताऱ्यातल्या सभेतल्या पावसाला दिले गेले. तेव्हापासून पवारांची सभा आणि पाऊस याच्या राजकीय दंतकथा मराठी माध्यमांनी रंगविल्या.
आज इचलकरंजीत पवारांच्या सभेत पाऊस झाला आणि पवारांनी देखील हा शुभ शकुन असल्यासारखे भाषण करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्यासाठी चांगले लागतील, असा दावा केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App