विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात गेले दोन दिवस विविध राजकीय वक्तव्यांमुळे खळबळ माजली आहे. त्याची सुरूवात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांनी केली होती. ते वक्तव्य होते, माजी मंत्री म्हणू नका… दोन दिवसांत कळेलच…, असे विधान त्यांनी केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे माझे भावी सहकारी हे विधान आले. त्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी हवा दिली. त्यातून महाराष्ट्रातली राजकीय हवा चांगलीच तापली. I never said Dont call me a former minister says BJP Chandrakant Patil
पण आता चंद्रकांतदादा पाटीलच फिरले आहेत. त्यांनी परवा केलेले आपले मूळ विधानच नाकारले आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले होते. पण आता ‘मला माजी मंत्री म्हणू नका असं काही मी म्हणालोच नव्हतो’, अशी कोलांटउडी मारत त्या विधानामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला आहे.
पुण्यात कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विधानासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, “मला माजी मंत्री म्हणून नका असे काही मी म्हणालो नव्हतो. एका प्रसंगावेळी माजी मंत्री बाळा भेगडेंना उद्देशून मी म्हणालो होते, कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली.”
चंद्रकांतदादांनी हे वक्तव्य करून मूळ विधानच नाकारले आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य भाजपमधूनच त्यांच्या अंगाशी आले की काय, की भाजप श्रेष्ठींकडून त्यांना कानपिचक्या मिळाल्यामुळे त्यांनी ही कोलांटउडी मारली आहे, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App