विशेष प्रतिनिधी
मुंबई : “इंडिया” आघाडीची महाबैठक मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये उद्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याआधी याच हॉटेलमध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील हे सगळे नेते उपस्थित होते. पण या पत्रकार परिषदेतला पत्रकारांचा प्रश्नांचा सर्व रोख उद्धव ठाकरेंकडेच वळल्यामुळे शरद पवारांच्या समोर “इंडिया” आघाडीचे महाराष्ट्रातले “हिरो” उद्धव ठाकरेच ठरले!! I.N.D.I.A press conference uddhav thackeray steals the show infront of sharad pawar, Congress leaders remained in mob scene!!
इतकेच नाही, तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फुटली की नाही??, वगैरे प्रश्नांची उत्तरे देखील उद्धव ठाकरेंनी देऊन पत्रकार आणि पवारांची गोची करून टाकली.
शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करत आहेत असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी, आता उद्या जातो आणि शपथ घेतो, अशी पत्रकारांची फिरकी घेतली.
पत्रकारांनी ज्यावेळी शरद पवारांना राष्ट्रवादी फुटली आहे की नाही?? या संदर्भातला प्रश्न विचारला त्यावेळी पवारांनी तसा कोणताही संभ्रम नसल्याचा खुलासा केला, पण त्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंनी हस्तक्षेप करत ही “इंडिया” आघाडीची पत्रकार परिषद आहे कुठल्याही एका पक्षाची पत्रकार परिषद नाही. आपण एरवी भेटतच असतो त्यावेळी ते प्रश्न विचारा असे सांगून तो प्रश्न बाजूला टाकून दिला. त्यावर उद्धव ठाकरेंना एका पत्रकाराने पण सामनामध्ये तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या फुटण्यावर दररोज टीका येते, त्याचे काय??, असा प्रश्न विचारला त्यावेळी उद्धव ठाकरे पटकन उद्गारले, आम्ही ज्यांच्या बरोबर असतो त्यांच्यावर टीका करतो. आम्ही भाजप बरोबर होतो, तेव्हा भाजपवर टीका करायचो. आता राष्ट्रवादी बरोबर आहोत. राष्ट्रवादीवर पण टीका करतो!!, या उत्तराने पत्रकार परिषदेत हशा पिकला.
पण एकूण आजच्या सर्व पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची रोख हे उद्धव ठाकरेंवरच राहिले. शेवटी उद्धव ठाकरेंनी तुम्ही नेमका कुणाला प्रश्न विचारत आहे ते नेमकेपणाने विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडून घेऊ नका, असे सांगून इंडिया आघाडीत संयोजक बनवणार की नाही तो कोण असेल??, या प्रश्नाचा रोख शरद पवारांकडे वळविला.
पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन संजय राऊत यांनी केले. सुरुवातीचे निवेदन काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले. पण पत्रकारांनी सर्व प्रश्न ठाकरे आणि पवारांनाच विचारले. त्यातही जास्त रोख ठाकरेंवरच होता. त्यामुळे आजच्या “इंडिया” आघाडीच्या आजच्या पत्रकार परिषदेतले परिषदेत शरद पवारांसमोर उद्धव ठाकरे हेच “हिरो” ठरले!! बाकीचे काँग्रेस नेते या पत्रकार परिषदेतल्या मॉब सीन मध्येच राहिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App