विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Sanjay Shirsat मला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला न्याय देतील, असा विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांनी महायुतीचे सरकार आणण्यासाठी जी बडबड केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असा टोला शिरसाट यांनी लगावला. ते आज माध्यमांशी बोलत होते.Sanjay Shirsat
विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पश्चित मतदारसंघातून संजय शिरसाट यांनी विजय संपादित केला आहे. त्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महायुतीच्या विजयाची कारणे सांगत संजय राऊत यांच्यावरही टीका केली.
काय म्हणाले संजय शिरसाट?
यंदाच्या निवडणुकीतवेळी सामान्य मतदारांच्या काय होते, हे चांगल्या जाणकारांनाही समजले नाही. ओढून ताणून महायुतीचे सरकार येईल, असा सर्व कौल होता. परंतु, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनो गेमचेंजर ठरली. महायुतीला निवडून द्यायचे हे लोकांनी ठरवले होते. महायुतीने केलेला काम, महायुतीतील एकता आणि सामान्यांना मिळालेला योजनेचा लाभ, यामुळे महायुतील प्रचंड बहुमत मिळाले.
महायुतीच्या विजयात संजय राऊतांचाही हात
विरोधकांना विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदही मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. यावरून विरोधी पक्षाची अवस्था आपल्याला दिसून येते. त्यामुळे टीका-टिपण्णी होत राहतील. मुख्यमंत्री कोणाचा होणार? हे सर्व प्रश्न निकाली लागणार आहेत. आम्ही संजय राऊत यांचेही आभार मानतो. त्यांनी महायुतीचे सरकार आणण्यासाठी अडीच वर्षे जी व्हायात बडबड केली, त्याचाही परिणाम काही अंशी मतदानात परिवर्तीत झाला आहे. त्यामुळे त्यांचेही आभार मानायला हवे, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
सिल्व्हर ओकवर चिंतन करणे हा एकच पर्याय
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या पराभवाचे खापर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्यावर फोडले. त्यांनी आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय लवकर न दिल्यामुळे ही परिस्थिती आल्याचे राऊत म्हणाले होते. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पराभव झालेला माणूस अनेक कारणे दाखवू शकतो. पण प्रत्येक ठिकाणच्या लढती कशा झाल्या, हे त्या भागातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांना विचारावे. त्यांच्याकडे आता आरोप करण्याशिवाय दुसरे काही नाही. सिल्वर ओकवर जाऊन चिंतनमनन करणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर आहे, अशी टीका शिरसाट यांनी केली.
जनतेने गद्दारांना त्यांची जागा दाखवली
आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेने गद्दांना गाडले आहे. गद्दारी कुणी केली? काय केली? पक्ष कुणाचा? या सर्व प्रश्नांची कालच्या निकालात दिसले. शिवसेना प्रमुखांचे विचार सोडणारे उबाठाचे नेते, शिवसेना फोडणारे शरद पवार अशा या गद्दारांनी जनतेने त्यांची जागा दाखवली याचा आम्हाला आनंद आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App